बोबडे बोल

मिष्का बोलायला लागल्यापासून फार मजा येते. एखादे लहान मूल भाषा कसे शिकते हे पाहणे एकदम गमतीचे आहे.
सुरुवातीला मिष्का बाबा, बाबा म्हणायची बहुतेक सगळ्याच गोष्टींना. आणि आजुबाजुच्या सार्‍यांना केवढे कौतुक की पोरगी बापाची भारी आठवण काढते. 
आम्ही तिला सतत गाणी म्हणून दाखवायचो तर ती त्या चाली गुणगुणायला लागली,शब्द येत नव्हते तिला तेव्हा. जसे की ई या ई या ओ किंवा twinkle twinkle ची धून.
मग तिला काही शब्द यायला लागले.
पाणी – बाबी
आणि काहीही नको असेल तर नाई. हो करता ह्म्म्म्म असा हुंकार.

हळुहळु तिला इतरही छोटे छोटे शब्द जमायला लागले. दादा, काका, माऊ, आजी, मायशी.
आजोबा – आबाबा
आणि मग एकदा आजी, आजोबा आले असताना तिने आजीला सांगितले

भूक नाहीये तर आजीला केवढा तरी आनंद झाला.

मग ती दोन शब्दांची वाक्ये बनवायला लागली. एकदा नीरज, मी आणि मिष्का Ring a ring roses खेळत असताना जेव्हा खाली बसलो तेव्हा मी तिला म्हटले

मिष्का उभी रहा

तर next round झाल्यावर खाली बसलो असताना म्हणाली “बाबा उभी रहा “.

Potty वर बसवले की म्हणते “आई बस” किंवा आज काल विचारते “हे काय आहे ” आणि आज TV पाहताना म्हणाली “मला हे नाही बघायचेय”

एखाद्या गोष्टीला काय म्हणायचे हे लहान मुले कशी शिकतात हे पाहणे रंजक आहे. मिष्का सर्व केस पिकलेल्या पुरूषांना आबाबा म्हणते पण एखाद्या काळे केसवाल्या वयस्क पुरूषाला आबाबा म्हणून स्विकारायला राजी नसते.
किंवा चांदण्यांना ती ABCD म्हणते. कारण चांदण्या म्हणजे  twinkle twinkle गाणे आणि त्याची धून म्हणजे ABCD गाणे. आणि ABCD ती लौकर बोलायला शिकली.
तिने तिच्या पाळणाघरात वाढदिवस साजरे केलेले पाहिले असावेत. एकदा घरी electricity नाही म्हणून मेणबत्त्या पेटवल्यावर तिने  “Happy birthday to you” गायला सुरुवात केली. आता तर सगळ्या प्रकाशाच्या स्त्रोतांना ती Happy birthday ch म्हणते. जसे की दिवे, पणत्या.

काही गोष्टींचे तिचे शब्दोच्चार मजेशीर असतात.
फुलपाखरू = बाबाबु
Baby TV = Baby tilly
केस = केश

आणि काही गोष्टींची संबोधने.
बदक = प्याक प्याक
गाय = हम्म

Advertisements