बायका आणि त्यांची टोळकी

मला एकंदर आमच्या colony मधल्या बायकांची भीतीच वाटते. I can’t fit into their group. सुदैवाने किंवा दुर्दैवाने मी typical बायकी topics वर बोलू शकत नाही. आणि over the period of time अशा बायकांच्या group ची मी धास्ती घेतली आहे. माझ्या सारखी कोणी, जिला धड स्वयंपाक येत नाही, नीट नेटके राहणे जमत नाही,  घरच्या गोष्टी म्हणजे पोरे बाळे, सासू सासरे,  नवरा यांच्या विषयी कोणाशी बोलायला जमत नाही, देवाशी काही संबंध नाही, बरे तर बरे, धड हिंदी English बोलता येत नाही, अशा मुलीचे त्या तरी काय करणार! दुर्लक्ष करणे किंवा चक्क दुष्ट टोमणे मारणे इथपासून ते अवघडलेली संभाषणे सगळे करून झाले. त्यांचे tip top कपडे, make up आणि hi fi English  बघूनच मी त्यांच्या वाट्याला जायला घाबरते.
आणि खरं सांगायचे तर आतापावेतो मला कधी त्यांच्या सोबत deal करायची वेळ पडली नाही.
मी माझ्या आणि त्या त्यांच्या जगात अगदी खुश होतो. पण मिष्का सोबत खाली गेलं की तिच्या वयाची मुले एकत्र खेळत असतात आणि त्यांच्या आया माझ्या मैत्रिणी नसल्याने तिला त्यांच्या मधे जाता येत नाही याचे मला खूप वाईट वाटते. आणि त्यांनी माझे त्यांच्याशी बोलायचे प्रयत्न हाणून पाडले की अजून वाईट वाटते. म्हणजे आपल्या कमीपणा मुळे आपल्या मुलीला का त्रास!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: