मिष्का आणि नीरज चे गाणे 

मिष्कुल आणि बाबा आंघोळीला गेले, आंघोळीला गेले, आंघोळीला गेले,

मिष्कुल आणि बाबा आंघोळीला गेले ,आंघोळीला गेले तर बादलीच नाही. 

आईने बादली आणून दिली ,आणून दिली,आणून दिली, 

आईने बादली आणून दिली ,आणून दिली तर पाणीच नाही. 

आईने पाणी सोडून दिले ,सोडून दिले,सोडून दिले, 

आईने पाणी सोडून दिले, पाणी घ्यायला गडवाच नाही. 

आईने गडवा आणून दिला, आणून दिला, आणून दिला

गडवा मिळाला तर साबणच नाही. 

नव्या साबणाने मग आंघोळ झाली, आंघोळ झाली, आंघोळ झाली, 

अंग पुसायला टॉवेलच नाही. 

अंग पुसून मग कपडे चढवले,कपडे चढवले,कपडे चढवले,

आई म्हणाली, “पण आज शाळाच नाही!”. 

Advertisements

मिष्का च्या आठवणी 

मिष्का आता आठवणी बनवायला लागली आहे. ती बोलता बोलता सहज बोलून जाते की त्या वेळी असे असे झाले होते. 

आमचे आत्ता ते संभाषण :

नीरज: तू मोठी झालीस की मी तुला तो skateboard देईन. 

मिष्का :त्यावर दोन्ही पाय ठेवायचे असतात. (हे पूर्वी कधीतरी नीरज ने सांगितले असणार.) 

नीरज : तुझ्या scooter वर एकच पाय ठेवायचा असतो. 

मिष्का : अर्चु मावशी च्या scooter वर दोन्ही पाय ठेवायचे असतात. 

म्हणजे तिला अर्चु मावशी, तिची scooter,तिने दिलेली scooter ride सगळे लक्षात आहे तर! 

भले शाब्बास. 

पुढे म्हणाली, त्यांच्या घरी ते डोक्यावर घेऊन गोल गोल फिरायचे आहे ना! 

बहुदा hoola loop म्हणायचे असावे तिला. 

अनेक वेळा म्हणते, आपण तिथे गेलो होतो ना किंवा सकाळी असे झाले होते ना! 

वेळ काळ  मात्र अजुनही सकाळ असाच आहे. सगळ्या गोष्टी सकाळी झालेल्या असतात किंवा सकाळी करायच्या असतात. 
एकंदर मजेशीर बडबड. 

अरे ती (Strawberry doll)  झोपली आहे ना, आवाज नको करु! 

बाबा, अरे बाबा, ऐक ग! 

आजोबा असेच करतात ना! (किर्र कावळा, पप्पू माझा बावळा) 

मी मोठी झाले ना की मी पण सायकल चालवणार आहे / dress घालणार आहे / nail polish लावणार आहे and the list goes on…